Monday, May 30, 2011

(१) फुटका पेला................................................... आणि पेले






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.







फुटका पेला ...... आणि पेले



शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला….गोठ्यातच जगला हेला

अडवून जरी शब्दांनी भरपूर खुशामत केली
दारात वर्तमानाच्या मी अर्थ उद्याचा नेला!

घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी
वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला

ही कुण्या राजधानीची कापती अजुन खिंडारे?
का कुणी कलंदर येथे गुणगुणत सुळावर गेला?

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही-”माणूस कोणता मेला?”

जर हवे मद्य जगण्याचे….तर हवी धुंद जन्माची
तू विसळ तुझ्या रक्ताने हृदयाचा फुटका पेला!

कवी : सुरेश भट

पहा, कविश्रेष्ठांनी उपद्व्याप केवढा केला
गुप्तार्थ कविता लिहूनी ढीग तयांचा रचला

खट्याळ जरी शब्दांनी भरपूर हजामत केली
साहून कविश्रेष्ठांनी काव्यगिरीपंक्ती उभी केली

घासती घरोघर भांडी स्वप्नांच्या राजकुमारी
झाडती घरोघर खोल्या स्वप्नांचे राजकुमारही

ते कुण्या राजधानीची उडविती पार दैना
नि कुणी बिलंदर नेती पळवून सुंदर ललना

पुसतात जात हे वाग्भट बोळात एकमेकांना
“करेल का विचारपुस अपुली जनता शुष्करसना ?”

“हवे अम्हा मद्य झिंगण्यासी , अन्‌ कविता रचण्यासी
हवे अम्हा पेले गुप्तार्थ, निरर्थ कवितांनी भरण्यासी“

No comments:

Post a Comment