खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
राजहंस सांगतो | मंत्रीपदस्थ महापुरुषाचे स्तवन |
---|---|
राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी तरी ही नित्य पाहते लाजूनी मनोमनी उगीच धुंद राहते ठाऊक न मजसी जरी निषध देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता दिवस रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्या परी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी नाद चित्र रेखितो, तुझेच मंद कूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता कवी : ग. दि. माडगूळकर चित्रपट : सुवासिनी | कोणी भाट सांगता कीर्तीच्या तुझ्या कथा थरारी हृदयी उपजते, नसे मुळीच ती नवता पाहिले तुला जरी अतिदूरदुरून मी सादरे मनोमनी कर जोडुनि मी नमी ठाऊक न मजसी जरी निषध देश कोणता महापुरुष पाहता, तसा तो हे असे मी जाणता दिवसरात्र एक ध्यास मम मनास लागतो तुझाच चेला असल्यागत मी सदैव वागतो सग्यासोयर्यां सांगतो तुझी अमोल योग्यता महापुरुष पाहता, तसा तो हे असे मी जाणता निमंत्रणाविना पुन्हा पुन्हा तुझ्या सभांत येई मी तुझेच चित्र रेखितो, तुझेच चिंतन नेहमी वेड लागता तुझे का जाई पाय मागुता? महापुरुष पाहता, तसा तो हे असे मी जाणता |
No comments:
Post a Comment