खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
त्या तिथे, पलिकडे | त्या तिथे, पलिकडे |
---|---|
त्या तिथे, पलिकडे, तिकडे माझिया प्रियेचे झोपडे गवत उंच दाट दाट वळत जाई पायवाट वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे कौलावर गारवेल वार्यावर हळु डुलेल गुलमोहर डोलता स्वागत हे केवढे! तिथेच वृत्ति गुंगल्या चांदराति रंगल्या कल्पनेत स्वर्ग तो तिथे मनास सापडे कवी : ग. दि. माडगूळकर |
त्या तिथे, पलिकडे, तिकडे माझिये मोडके झोपडे गवत उंच दाट दाट न दिसे नीट पायवाट वळणावर दृष्टिस ये परंतु एक बाकडे कौलावर कबुतरांनी घरटे एक केले असे कबुतर एक घुमता स्वागत हो तेवढे! तिथेच वृत्ति गुंगल्या चिलिमीत ज्या फुंकल्या कल्पनेत स्वर्ग तो तिथे मनास सापडे |
No comments:
Post a Comment