Monday, May 30, 2011

(४) असा बेभान हा वारा...........................................कोपिष्ट मॅनेजर माझा






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






असा बेभान हा वारा कोपिष्ट मॅनेजर माझा


असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जिवाचे फूल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

कुळाचे, लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

कवी : मंगेश पाडगांवकर

कोपिष्ट मॅनेजर माझा, माझी चूक कुठे लपवू
अवचित तो उपटता, कुठे लपवू, कुठे छपवू

मूर्ती जटा पिंजलेली डोळ्यांपुढे उभी राही
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
कुडी ह्या शरीराची “त्या” पायी कशी ठेवू
अवचित तो उपटता, कुठे लपवू, चूक छपवू

नोकरीच्या माझ्या तुटणार का धागे
बुडणार का जग नि का राहील काही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू
अवचित तो उपटता, कुठे लपवू, चूक छपवू

अपुल्या क्रूर शापांचे, कुणी फेकले भाले
दुर्भाग्य माझे हे, का समंध होऊनी आले
घे मज, धरे, उरी आता, किती मी हाक ही देऊ
अवचित तो उपटता, कुठे लपवू, चूक छपवू


No comments:

Post a Comment