खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
एक झोका | पेग |
---|---|
एक झोका, चुके काळजाचा ठोका उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे जरा स्वतःलाच फेका नाही कुठे थांबायचे मागेपुढे झुलायचे हाच धरायचा ठेका जमिनीला ओढायचे आकाशाला जोडायचे खूप मजा, थोडा धोका कवी : सुधीर मोघे चित्रपट : चौकट राजा (१९९१) |
एक झोका, चुकेल काळजाचा ठोका दोन झोका, चुकतील दोन ठोके नका झोकू जास्त पेग सोमरस न सौम्य असे तर्र तुम्हा सहज तो करू शके नाही झोकताना थांबायचे मागेपुढे झुकायचे - नका धरू तुम्ही हे ठेके जमिनीवर पडायचे आकाशाकडे पहायचे नाही मजा त्यात, पुष्कळ धोके |
No comments:
Post a Comment