Wednesday, June 1, 2011

(६) थेंब..............................................................मी द्रष्टा






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






थेंब मी द्रष्टा


काय जे होणार माझे
ते मला माहीत आहे!
मी तुझ्यासाठी तरीही
जिन्दगी जाळीत आहे!

पाहिला जो चेहरा मी
तो कुठे माझा निघाला?
मी कधीपासून माझा
चेहरा शोधीत आहे!

शेवटी झालेच नाही
चांदणे माझे तरीही
मी कुठे हा तू दिलेला
चन्द्र नाकारीत आहे!

चालणारया यात्रिकांना
रोखले कोणी कळेना,
हा सुना रस्ताच आता
पावले टाकीत आहे!

का करू आता खुलासा?
सांगण्याची वेळ गेली
कालच्या माझ्या चुकांनो,
आज मी घाईत आहे!

वाटतो आहे जगाला
हा जरी पेला रिकामा,
मी तळाशी राहिलेले
थेंब काही पीत आहे!

कवी : सुरेश भट


काय जे होणार माझे
ते मला माहीत आहे!
ओळखे जग मज विप्र, द्रष्टा,
दूरदर्शी - हे फुकाचे नोहे

चष्मा जो पाहिला मी
तो कुठे माझा निघाला?
मी कधीपासून माझा
चष्मा धुंडाळीत आहे

शेवटी झालेच नाही
भांडणे आपले तरीही
मी कुठे तू दिलेला
वाद नाकारीत आहे?

चालणार्‍या यात्रिकांना
रोखले कोणी कळेना,
रोखणार्‍या माणसांना
जकात मी देत आहे

का करावे मी खुलासे
माझ्या पिसाट बोलण्याचे?
सौमेधिक साधू मी,
दूरदर्शी, विप्र मी

वाटतो आहे जगाला
हा जरी पेला रिकामा,
अदृश्य त्यातली वारुणी मी
हर्षभरे पीत आहे!



No comments:

Post a Comment