Wednesday, June 1, 2011

(७) परी म्हणू की सुंदरा......................................आणि मग दोन वर्षांनंतर...






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






परी म्हणू की सुंदरा आणि मग दोन वर्षांनंतर...


परी म्हणू की सुंदरा
तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा
ही मेनका कुणी जणु निघाली

तिचे वळून पाहणे
मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासणे
हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे
कधीच दिल तिच्या हवाली

हजारदा ती भेटते
बोलुबोलु वाटते
बोलणे मनातले
परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी फुले
जशी हजार भोवताली

कवी: गुरु ठाकूर


कैकेयी म्हणू की मंथरा
तिची तऱ्हा असे जगावेगळी
आणी व्यथा तिची अदा
ही महिषी अता कुठे निघाली

तिचे विखारी पाहणे
कारल्यागत कटु बोलणे
कधी विकट हासणे
ओठ घट्ट चावणे
मोकळा करुन मी मला
कधीच नशिबाच्या हवाली

हजारदा ती भांडते
कैदाशिण भासते
चिंतन मनातले
परि मनीच राहते
वृत्ती तिची अशी चिलटे जशी
हजार भोवताली



No comments:

Post a Comment