Tuesday, June 21, 2011

(१३७) अत्तराचा फाया.............................आणि थंडगार आइस्क्रीम



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अत्तराचा फाया ...आणि थंडगार आइस्क्रीम



अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया

विरहाचे ऊन बाई,
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी,
चंदनाची छाया

नाही आग नाही धग,
परी होइ तगमग
विस्तवाशिवाय पेटे,
कापराची काया

सुगंधाने झाले धुंद,
जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे,
अशी करा माया

कवी : संजीव
चित्रपट : भाऊबीज (१९५५)

थंडगार आइस्क्रीम
मला आणा खाया

वैशाखाचे ऊन बाई,
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी,
जरा दयामाया!

होते आग भासे धग,
शरीराची तगमग
स्टोव्हसारखी पेटे
माझी कोवळी काया

ग्लानिने मी झाले सुन्न,
श्वास जणु झाला बंद
देहावसान होण्यापूर्वी
आइस्क्रीम आणा खाया!


No comments:

Post a Comment