Tuesday, June 21, 2011

(१३६) स्वप्नामध्ये..................................आणि गुंगीमध्ये



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



स्वप्नामध्ये आणि गुंगीमध्ये



स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले!

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

कवी : विंदा करंदीकर


गुंगीमध्ये रचता ओळी
व्याकरण मला न आठवले!
अर्थ चालला भिंत धरून
शब्द नि पाय, दोन्ही लटपटले!

प्रतिमा झाल्या उलट्यासुलट्या
नजर माझी भिरभिरली;
शब्द पांगले, अर्था भ्याले
चढली फारच ताडी!

अंधुक होई दृश्य धुक्याने
मला न कोणी सावरले;
भिंतीवर कोळी रचत ओळी
बसलेला नजरेस दिसे!


No comments:

Post a Comment