खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अग पाटलाच्या पोरी | फौजदाराचं गाणं |
---|---|
अग पाटलाच्या पोरी जरा जपून जपून बिगिबिगी कुठं ग जाशि शेतामधून? तुझ्या गालाचि खुलली लाली ग जणु डाळिंब फुटतंय गाली लइ घुटमळतंय् माझ्या मनात चल जाऊ दूर मळ्यांत संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून आलं ऊन ग भवती फुलुनी कुठं जाशी तु ग फुलराणी? काटं ग बोचतिल बाई नाजुक तुझ्या पायी तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून! रानी वाऱ्याची ऐकून गाणी नाचे झऱ्याचं झुळुझुळु पाणी लइ घुटमळतंय् माझ्या मनात चल जाऊ दूर मळ्यांत संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून कवी : श्रीनिवास खारकर |
अरं हरामखोरा जरा लपून लपून बिगिबिगी कुठं रं जाशि बोळामधून? तुज्या नशिबाची दोरी तुटली रं जणु होडकं फुटलंय समिंदरी लइ घुटमळतंय् माझ्या मनात चल घालू तुज्या हातात कड्या, नि मग चालु दोघं मिळून आलं ऊन रं डोईवरती कुठं जाशी तु रं अनवाणी? काटं बोचतिल की रं लई नाजुक तुझ्या पायी तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून! तुज्या वरातीची ऐकून गाणी नाकझरीचं झुरु लागंल पाणी लइ घुटमळतंय् माझ्या मनात चल घालू तुज्या हातात कड्या, नि मग चालु दोघं मिळून |
No comments:
Post a Comment