खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही |
पश्न ऐसा न ज्या उत्तर : “करतो मी का बहाणा?” |
---|---|
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा, मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा. एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा, मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा. प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा, जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना. याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती, नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती. सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा. दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. कवी : आरती प्रभू |
"दु:ख ना आनंदही", ही बात माझी ना सही म्हणतो वरकरणी जरी कालही अन आजही. मी तसा मुळीच नाही, ना मुळीच मी तसा ते नसे खरे बिंब माझे, सत्य सांगतो आरसा. एकला मी गमुनी येई खिन्नता माझ्या मना मी नसे स्वामी, अभाव भावांचे ज्याच्या खुणा. पश्न ऐसा न ज्या उत्तर : “करतो मी का बहाणा? ’दु:ख ना आनंदही, न पायी चप्पल ना वहाणा!’ ” ’याद नाही, ब्याद नाही, गगन माझ्या सोबती, ’न गरज वसनाची धडाला असे त्याच्या भोवती! ’परब्रह्म आणि काया जोडुनी यांचा दुवा ’नाव माझी चाललेली, शिडीमधे भरुनी हवा.’ “ "दु:ख ना आनंदही", ही बात माझी ना सही म्हणतो वरकरणी जरी कालही अन आजही. |
No comments:
Post a Comment