खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तरीसुध्दा | शिवाय |
---|---|
समूहात बसूनही गाणी ऐकावीशी वाटली तरी त्यात काय चूक आहे? शब्दांचं नादरुप असं मिळून भोगणं ही प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे. तरीसुध्दा डोळे मिटून मनोमय तालावर नाचता आलं पाहिजे; एकटं बसून एकट्याने कवी : मंगेश पाडगांवकर | समूहात बसून शेजार्यापाजार्यांबद्दल चटकदार अफवा ऐकाव्याश्या-सांगाव्याश्या वाटल्या तर त्यात काय चूक आहे? शब्दांचं नादरुप असं मिळून भोगणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. शिवाय डोळे मिटून मनोमय नव्या अफवा निर्माण करता आल्या पाहिजेत आरामखुर्चीवर पहुडल्या पहुडल्या |
No comments:
Post a Comment