खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अताशा | ताडीचा अंमल |
---|---|
अताशा असे हे मला काय होते? कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते बरा बोलता बोलता स्तब्ध होतो कशी शांतता शून्य शब्दात येते कधी दाटू येता पसारा घनांचा कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळुवार काही जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा असा ऐकू येतो क्षणांचा इशारा क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा नभातून ज्या रोज जातो बुडोनी नभाशीच त्या मागू जातो किनारा न अंदाज कुठले, न अवधान काही कुठे जायचे यायचे भान नाही जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा न कुठले नकाशे, न अनुमान काही कशी ही अवस्था कुणाला कळावे? कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे? किती खोल जातो तरी तोल जातो असा तोल जाता कुणी सावरावे? कवी : संदीप खरे |
सांगतो, कोणी ऐका मला काय होतेय अंधुक सगळे जग डोळ्यास दिसतेय बोलता बोलता स-स-स-स्खलन होतेय अगम्य विसंगति शब्दात येतेय वरी पाहता पसारा ढगांचा दिसू लागतोय दंगा दानवांचा जोशात हालते हात दिसती त्यांचे आणि दिसे त्यांचा हैदोस भांडण्याचा कानी ऐकू येतोय भुतांचा इशारा "पळ रे झणी", बडव-बडवूनि नगारा नभातून मग उतरताहेत समोरी शिवभूतगण सर्व भरुनी खटारा न संधान कसले, न अवधान काही कुठे जायचे यायचे भान नाही जशी धूळ निघते हवेच्या प्रवासा न कुठले नकाशे, न अनुमान काही अशी ही अवस्था, नव्हे दुरवस्था कुणी दाखविल का मला थोडी आस्था? असा तोल जातो तसा तोल जातो विनवतो तोल जाता “सावर रे, गृहस्था!" |
No comments:
Post a Comment