खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
सकाळी उठोनी | श्रीमंत पतीची राणी |
---|---|
सकाळी उठोनी । चहा-काँफी घ्यावी, तशीच गाठावी । विज-गाडी || दाती तृण घ्यावे । हुजूर म्हणून; दुपारी भोजन । हेची सार्थ || संध्याकाळ होता | भूक लागे तरी, पोराबाळांवरी । भुंकू नये || निद्रेच्या खोपटी । काळजीची बिळे, होणार वाटोळे । होईल ते || कुण्याच्या पायाचा । काही असो गुण; आपुली आपण । बिडी प्यावी || जिथे निघे धूर । तेथे आहे अग्नी; आम्ही जमदग्नी । बहुरूपी || कवी : बा.सी.मर्ढेकर |
सकाळी उठोनी । टीव्ही लावावा, ब्रेकफास्ट घ्यावा । आरामात ॥ आचार्या सांगावा । मेन्यू दिवसाचा; कार्यक्रम अंघोळीचा । उरकावा ॥ दोनचार मैत्रिणींना । फोन करावा, शॉपिंगचा ठरावा । बेत दुपारचा ॥ नट्टापट्टा करून । बाहेर पडावे; चायनीज लंच घ्यावे । मैत्रिणींसमवेत ॥ मग शॉपिंग मॉली । भ्रमंती करावी; तुडुंब भरावी । शॉपिंग बॅग ॥ घरी परतूनी । कॉफी गोड चाखत शरीर विसावत । बसावे सोफ्यावर ॥ डिनरचा कार्यक्रम । संपवावा रात्री भर्ता-पुत्र-पुत्री । ह्यांसमवेत ॥ मग दहा वाजता । वेळ झोपण्याची; योजना उद्याची । साधारण ऐशीच ॥ जय जय रघुवीर समर्थ । |
No comments:
Post a Comment