Tuesday, June 21, 2011

(१४४) आला वसंत देही.............................भरले दिवस माझे



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



आला वसंत देही भरले दिवस माझे



आला वसंत देही, मज ठावूकेच नाही

भीतीविना कशाचा देहावरी शहारा
हे ऊन भूषविते सोन्यापरी शरीरा
का गुंफिली जरीने आभाळीची निळाई

ओठांत थांबते का हासू उगाच माझे
बाहेर डोकविता का बोल आज लाजे
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या नेणत्या जीवाला हे गूज आकळेना
ये गंध मोगर्‍याचा, आली फुलून जाई

कवी : ग. दि. माडगूळकर
चित्रपट : प्रपंच (१९६१)

भरले दिवस माझे, मज ठावूकेच नव्हते

भीतीपरत्वे आला देहावरी शहारा
गात्रांमधुन माझ्या निथळति घर्मधारा
गुंफिले मज खास जाली धूर्त पोलिसांनी

ओठांत थांबले शब्द, “हे प्रारब्ध माझे”
नसे रम्य खचित दृश्य दिसे मला जे
येई कावळ्याची कटु कावकाव कानी

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या अजाणत्या जीवाला हे गूढ आकळेना
ये गंध केवड्याचा, घडे सर्पदंश रानी


No comments:

Post a Comment