Tuesday, June 21, 2011

(१४५) धुआरी.....................हा हा हरवली चिमा प्रियतमा माझी जीवाची सखी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



धुआरी हा हा हरवली चिमा प्रियतमा
माझी जीवाची सखी



उदासीन मन झाले का ये वेळी
आणिकांचे मेळी
सुख न ये

उसळले ढग
आभाळ भरून
आले अंधारून
जग सारे

कोसळे पाउस
सरीवर सरी
दाटली धुआरी
चोहुकडे

तुझा ये आठव
अश्या अवसरी
मूर्ति चित्तांतरी
उभी राहे

जगात राहून
जगास पारखा
आठवी सारखा
प्रेम तुझे

कवी : अनिल


उदासीन मन झाले का ये वेळी
कुठल्याचि विड्यांच्या मेळी
सुख न ये

उसळले ढग
आभाळ भरून
आले अंधारून
जग सारे

कोसळे पाउस
सरीवर सरी
दाटली धुआरी
चोहुकडे

तुझा ये आठव
अश्या अवसरी
मूर्ति चित्तांतरी
उभी राहे

जगात राहून
तुझ्यास पारखा
आठवी सारखा
प्रिय चिलिमे, तुला!


No comments:

Post a Comment