खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
उद्या | नोटीस |
---|---|
उद्या उद्या तुझ्यामध्येच फाकणार न उद्या तुझ्यामध्येच संपणार ना कधीतरी निशा उद्या तुझी धरून कास आज कार्य आखले तुझ्यावरी विसंबुनी कितीक काम टाकले उद्या तुझ्याचसाठी आज आजचे न पाहतो तुझ्याचकडे लावुनी सदैव दृष्टी राहतो उद्या तुझ्यासवे निवांत आजचा अशांत मी उद्या तुझ्यामुळेच जिवंत आजचा निराश मी कवी : अनिल |
उद्या तुझ्यामाझ्यामध्येच फाकणार झगडा फाकडा, तुझी मिजासी संपणार, उतरणार तुझी नशा मनी तुझी धरून शेंडी आज कार्य आखले, उर्वरित कालचे करुन काम टाकले उद्याच्या तंट्यासाठी आज घेतली पूर्ण दक्षता, उद्याकडेच लावुनी सदैव दृष्टी राखली उद्या तुझ्यासवे समर आज पूर्ण शांत मी, चंडवातपूर्व उदधि स्मर निसर्गचाल ही! |
No comments:
Post a Comment