Monday, July 18, 2011

(२०२) जशि धोब्याची मऊ इस्तरी......................जशि धोब्याची गरम इस्तरी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



जशि धोब्याची मऊ इस्तरी जशि धोब्याची गरम इस्तरी



जशि धोब्याची मऊ इस्तरी
तलम फिरावी सुतावरूनी
फाल्गुनातली चन्द्रकोर तशि
मलिन मनाच्या धाग्यांवरुनी

शिणेल धोबी यदाकदाचित,
पडेल खाली चन्द्रकोर अन्
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना
पुनश्च कोठे भट्टी भगवन्

कवी : बा.सी.मर्ढेकर

जशि धोब्याची गरम इस्तरी
कौशल्ये फिरते शर्टावरुनी
तसाच फिरतो मनावरुनी;
सुरकुत्या जाती अन निस्तरुनी

शिणेल धोबी यदाकदाचित,
बसेल खुर्चीवर तमाखू खात,
राही इस्तरी परी मम फिरत
सुरकुत्या निस्तरत अविरत


No comments:

Post a Comment