खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
पिपात मेले ओल्या उंदिर | पिपात दिसले ओले उंदिर |
---|---|
पिपात मेले ओल्या उंदिर; माना पडल्या, मुरगळल्याविण; ओठांवरती ओठ मिळाले; माना पडल्या, आसक्तीविण. गरिब बिचारे बिळात जगले, पिपात मेले उचकी देउन; दिवस सांडला घाऱ्या डोळी गात्रलिंग अन धुऊन घेउन. जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे. उदासतेला जहरी डोळे, काचेचे पण; मधाळ पोळे ओठांवरती जमले तेही बेकलाइटी, बेकलाइटी! ओठांवरती ओठ लागले; पिपात उंदिर न्हाले! न्हाले! कवी : बा.सी.मर्ढेकर |
पिपात दिसले ओले उंदिर म्हटले बांधू कवितामंदिर; शब्दांमध्ये शब्द गुंफवून कविता रचली फार श्रमांविण. गरिब बिचारे शब्द मराठी पिपात होते बसले निमूट; त्यांपैकी काहींना मूठभर काढले बाहेर धुऊन घेउन. काव्य करायची सक्ती भासते, काव्य करायची शक्ती भासते. पाहू नका वटारून डोळे चष्म्याच्या काचांतून पण घारे, करडे, किंवा काळे; नका आणू ओठांवरती शब्द रागीट अथवा कडवट; माझे काव्य असे संपले; गंगेत घोडे न्हाले! न्हाले! |
No comments:
Post a Comment