खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
फिरुनी नवी जन्मेन मी | फिरुनी नवी जन्मेन मी |
---|---|
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील सार्या लयाला प्रथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना व्यथा ना बंधने नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी या वाहणार्या गाण्यातूनी लहरेन मी, बहरेन मी शिशीरातूनी उगवेन मी कवी : सुधीर मोघे चित्रपट : पुढचं पाऊल | मागच्या जन्मीची संपवून यात्रा फिरुनी नवी जन्मेन मी डॉक्टरांनी उलटी धरता तारस्वरे ट्यां ट्यां करता श्वास पहिला घेईन मी; ट्यां ट्यां करणे चालू असता डॉक्टरी गाढ ज्ञान वापरुनी डॉक्टर जेव्हा करती पुकारा "सानुली आहे ही मुलगी" निर्विकार राहीन मी श्रांत झोप डोळ्यात माझ्या खूप झोप घेईन मी माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी झोपणे अन् पिणे दूध - दोन गोष्टीत बहरेन मी धरेतून बीज जेवि उगवेन मी |
No comments:
Post a Comment