Thursday, June 2, 2011

(१०) तुझे गीत गाण्यासाठी........................................नळराजाची आळवणी






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






तुझे गीत गाण्यासाठी नळराजाची आळवणी


तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाउ दे रे

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे रे

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहु दे रे

कवी : मंगेश पाडगांवकर

तिन्ही हंडे लवकर भरुन जाउ देत रे
मी उभी पाण्यासाठी; “लक्‌" लागू दे रे

नियत वेळ पाळुन आले घाई घाई करुनी
रानफुले लेवुन सजणार हिरवी साडी नेसुनी
त्या सुंदर यात्रेसाठी मला जाउ दे रे

भय्या दूधवाला येई पहाटेस दारी
दूर कुणी टुणुं टुणुं वाजवी एकतारी
न्हाणीघरात जाउनी मला न्हाऊ दे रे

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझी आशा घेउन येती कुंद कुंद वारे
पाण्यात गरम गरम मला न्हाउ दे रे

एक मिणमिणता दिवा लागताना
आणि इथे येण्यासाठी पहाटे जागताना
आळवणी आर्त स्वरांची तुला वाहु दे रे


No comments:

Post a Comment