खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
ज्वानीच्या आगीची मशाल हाती | वाघ्या |
---|---|
ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसंच्या भयाण राती काजवा उडं, किर्किर किडं, रानात सुरात गाती दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला, ग बाई बाई, कुठं दिसंना मला कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं? दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला गडी अंगानं उभा नी आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा काळजामंदी घुसला, ग बाई बाई काळजामंदी घुसला माझ्या राजाचा न्यारा डौल डाव्या डोळ्याचा देतोय् कौल लहरी पटका, मानेला झटका भाला उरी घुसला ग बाई बाई भाला उरी घुसला अंगा-अंगाची करते अदा उडंल भडका, चढंल धुंदी जीव जीवा फसला, ग बाई बाई जीव जीवा फसला कवी : जगदीश खेबुडकर चित्रपट : पिंजरा (१९७२) |
शोधाया घेऊन विजेरी हाती निघाले मी अवसंच्या भयाण राती काजवा उडं, किर्किर किडं रानात सुरात गाती वाघ्या कुतरा, जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला, ग बाई बाई, कुठं दिसंना मला कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं? दिसला ग बाई दिसला मला बघून जोरात भुंकला ग बाई भुंकला वाघ्या अंगानं उभा नी आडवा करंल कुणालाबी झटकन् आडवा रुबाबाचा मुखडा, सोन्याचा तुकडा काळजामंदी बसला, ग बाई बाई काळजामंदी बसला माझ्या वाघ्याचा न्यारा डौल डाव्या डोळ्यावर काळा येक पट्टा अन् पाठीवर पट्टा, मानेवरबी पट्टा काळजामंदी बसला, ग बाई बाई काळजामंदी बसला माझ्या अंगाशी करतुया लगट हाये बाई तो भारी दणकट मी भुईवर पडंल एका झटक्यात पर जीव न घाबरा माझा, ग बाई बाई जीवा न माझ्या घाबरा |
No comments:
Post a Comment