Friday, June 3, 2011

(१२) का हासला किनारा...........................................संभ्रम






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






का हासला किनारा संभ्रम



का हासला किनारा पाहून धुंद लाट
पाहुनिया नभाला का हासली पहाट ?

होती समोर माया गंभीर सागराची
संगीत मर्मराचे किलबील पाखरांची
काठावरी उभी मी, तू न्याहळीत पाठ
पाहुनिया नभाला का हासली पहाट?

चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
भारावल्या कळीला जणू पाकळी मिळाली
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात
पाहुनिया नभाला का हासली पहाट?

कवी : जगदीश खेबुडकर



बहु हासला समाज पाहून त्याचा थाट
पाहून बर्ताव त्याचा, जणु समीर पिसाट

स्वप्रतिमा मनात त्याच्या अथांग सागराची
संगीत कानी त्याच्या अपुल्या महत्पदाची
उभा राहून काठावरी होई अपुलाच भाट
बहु हासला समाज पाहून त्याचा थाट

जाणीव वास्तवाची मनातुनी गळाली
कर्तबगारी अपुली जणु गगना मिळाली
न जुळावेत कुणाचे त्याच्या समोर हात?
बहु हासला समाज पाहून त्याचा थाट



No comments:

Post a Comment