खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
केळीचे सुकले बाग | वरुणराजाची वक्रदृष्टी |
---|---|
केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी अशी कुठे लागली आग, जळति जसे वारे कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा किती जरी घातले पाणी, सावली केली केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली कवी : अनिल | शेताचे विकले भाग, नसुनिया पाणी कोमेजलि कवळी कणसे, असुनि निगराणी जशी कुठे लागली आग, जळते वाहती वारे कुठे तरी पेटला वणवा, भडके शेत सारे अति कडक लागे झळ, आर्त माझ्या जीवा माझ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा किती केली आळवणी वरुणराजाची वक्रदृष्टी वरुणराज करे, गमे ही सजाची |
No comments:
Post a Comment