Saturday, June 4, 2011

(१४) तळव्यावर मेंदीचा..................................एका वर्षानंतर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तळव्यावर मेंदीचा ...एका वर्षानंतर


तळव्यावर मेंदीचा अजुन रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

गाईलेस डोळ्यांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये, हाती मम आला

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला

ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरूलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला

कवी : शांताराम नांदगावकर


भिंतींवर डिस्टेंपर अजुन असे ओला
माझ्या मनी खर्च किती, हिशेब झाला

गाईले मम डोळ्यांनी एक खिन्न गाणे
मन बेचैन्न भांड्यातिल मोजते फुटाणे
पण सुदैव, महिनाखेर पगार हाती आला !

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन घोडी पैश्यांच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला !

ही दुपार भिजलेली भासे चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरूलतांत
आज ३० तारखेस जीव धन्य झाला !



No comments:

Post a Comment