खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अखेरचा | नशिबाचा घाला |
---|---|
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले आता दे परि सारे सरले, उरलं मागं नाव . . हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता कुणी न उरला वाली आता, धरती दे गं ठाव कवयित्री : शांता शेळके चित्रपट : मराठा तितुका मेळवावा (१९६४) | अखेरचा हा तुला दंडवत घालून जातो तुला महाराष्ट्रातल्या महापुढार्या, सोडून जातो तुला तुझ्या शिवारी जगलो, फसलो, तव बोलांचे अमृत प्यालो आज तव चेलेपण सरले, उमज येता मला ********************* (पुढार्याचे स्वगत:) हाय, सोडूनी गेला आता शेवटचा माझा चेला, आता मीच चेला माझा; नशिबाचा कटु घाला! |
No comments:
Post a Comment