खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
क्षितीज रुंद होत आहे | क्षितीज |
---|---|
आज माझ्या वेदनेला अर्थ नवा येत आहे आणि मेघांच्या डफावर थाप बिजली देत आहे आज मरण आपुल्याच मरणाला भीत आहे आणि मृत्युंजयी आत्मा पुन्हा धडक देत आहे आज शुष्क फांद्यावर बहर नवा येत आहे भूमीच्या गर्भामधुनी बीज हुंकार देत आहे आज सारे गगन थिटे नजरेला येत आहे काळोखाच्या तबकडीत सूर्य गजर देत आहे आज तडकलेले मन एकसंध होत आहे आणि उसवलेले धागे गुंफूनीया देत आहे आज माझ्या कोरड्या गा शब्दात आग येत आहे आणि नव्या सृजनाचे क्षितीज रुंद होत आहे. कवी : नारायण सुर्वे |
आज माझ्या वेदनेला प्रमाण नवीन येत आहे आणि कपाळाच्या डफावर थाप माझा हात देत आहे आज माझी डोकेदुखी मला संत्रस्त करत आहे हाय , डोकेदुखीची एक नवी तिडीक येत आहे आज माझ्या खांद्यावर मस्तक जणु गरगरते आहे पोटाच्या मध्यामधुनी बेंबी हुंकार देत आहे आज सारे गगन थिटे कोसळल्यागत भासत आहे काळोखाच्या बंदिशाळेत मी चिडीचाप बसून आहे आज भडकलेले मन माझे पार दुभंगत आहे आणि उसवलेले धागे चड्डीचे मी हाताळत आहे आज माझ्या कवितेच्या कागदाला मी आग लावत आहे आणि नव्या सृजनाचे क्षितीज एका बिंदूत... संकोचले आहे ! |
No comments:
Post a Comment