Saturday, June 4, 2011

(१७) जिवलगा, राहिले रे दूर घर माझे..............फोर्क्लोझर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



जिवलगा, राहिले रे दूर घर माझे फोर्क्लोझर




जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोवती दाटून येई
सुख सुमनांची सरली माया पाचोळा वाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे

गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे

निराधार मी, मी वनवासी
घेशील केव्हा मज हृदयासी
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे


कवयित्री : शांता शेळके


दोस्ता माझ्या, जाहले रे दूर घर माझे
देणे थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोवती दाटून येई
सुख सुमनांची सरली स्वप्ने डांगोरा वाजे
दोस्ता माझ्या, जाहले रे दूर घर माझे

हप्ता मागचा मागे पडला
त्यामागचे हप्ते, तोच हवाला
फोर्क्लोझरांची असे सराई, मिटले दरवाजे
दोस्ता माझ्या, जाहले रे दूर घर माझे

विनानोकरी, मी वनवासी
निजाया देशील का ओसरी?
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे
दोस्ता माझ्या, जाहले रे दूर घर माझे


No comments:

Post a Comment