Saturday, June 4, 2011

(१८) काटा रुते कुणाला.......................आकडा



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



काटा रुते कुणाला आकडा



काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चीरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे

काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे

हा स्नेहवंचना की काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे

कवयित्री : शांता शेळके


आकडा लागे कुणाला, चीत्कारतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चीरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे

आकडा लावू पहातो, रुजतो अनर्थ तेथे
अडत्याचे बोलणेही विपरीत होत आहे

हे मृगजळ असे की काहीच आकळेना
माझी बचत पाघळोनी मी रिक्तहस्त आहे!


No comments:

Post a Comment