खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
दुभंगून जाता जाता | सोमरसप्रेम्याचे कवन |
---|---|
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो! चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो! सल जुनेच सलता सलता सुखावून गेले! अन् हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले! कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो! दुभंगून जाता जाता मी अभंग झालो किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो! अन् असाच वणवणताना मी मला मिळालो! सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो! दुभंगून जाता जाता मी अभंग झालो ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी! निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी! तरू काय? इंद्रायणिचा मी तरंग झालो! दुभंगून जाता जाता मी अभंग झालो कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी! मी इथेच केली माझी सोसण्यात वारी! ’पांडुरंग’ म्हणता म्हणता ’पांडुरंग’ झालो! दुभंगून जाता जाता मी अभंग झालो कवी : सुरेश भट |
झिंगून जाता जाता मी अजिंक्य झालो! चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो पायतण जुनेच चालता चालता दुखावून गेले अन् बरेच करकरते किती काळ न जाणलेले अशी कथा कथता कथता मी स्खलित झालो झिंगून जाता जाता मी अजिंक्य झालो! पायतण धरुनी हाती मी पुढे निघालो अन् असाच वणवणताना मी तुला मिळालो सर्व बांध फुटले; माझा मीच तंग झालो झिंगून जाता जाता मी अजिंक्य झालो! हे कवन लिहीत असता मी काही ओळी गाळी निमित्त असे ते घडण्या मम बह्मानंदी टाळी करू काय? इंद्राणीचा मी तुरंग झालो! झिंगून जाता जाता मी अजिंक्य झालो! कुठे धिंड निघाली मम कळेना, तुला विचारी मी इथेच केली होती तुरंगावर स्वारी! ’पांडुरंग’ म्हणता म्हणता कृष्णरंग झालो झिंगून जाता जाता मी अजिंक्य झालो! |
No comments:
Post a Comment