Saturday, June 4, 2011

(२०) धुंद होते शब्द सारे.........................कवीचे स्वगत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



धुंद होते शब्द सारे कवीचे स्वगत




धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांबल्या

सैये, रमुनिया सार्‍या या जगात
रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द

मेघ दाटुनी गंध लहरुनी
बरसला मल्हार हा
चांद राती भाव गुंतुनी
बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले,
भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैये, रमुनिया सार्‍या या जगात
रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे
वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांबल्या

कवी : कौस्तुभ सावरकर
चित्रपट : उत्तरायण (२००५)


गूढ होते शब्द सारे कुंद होत्या भावना
वार्‍यासंगे वाहता त्या गीतापाशी ह्या थांबल्या

गूढ होते शब्द सारे कुंद होत्या भावना
वार्‍यासंगे वाहता त्या गीतापाशी ह्या थांबल्या

विहरूनीया काव्यजगात
पार गोंधळून मी असे
कैसे गुंफू गीत हे गूढ राही मजपुढे

मेघ दाटुनी गंध लहरुनी
बरसला मल्हार हा
चांद राती शब्दीं गुंतुनी
गुंफला गुंतावळा हा
का कळेना काय झाले,
भास की आभास सारे
जीवनाचा एक गुंता विश्रांत ना शांत ना

गूढ होते शब्द सारे कुंद होत्या भावना
विहरूनीया काव्यजगात
पार गोंधळून मी असे
कैसे गुंफू गीत हे

गूढ होते शब्द सारे कुंद होत्या भावना
गूढ होते शब्द सारे
वार्‍यासंगे वाहता त्या गीतापाशी ह्या थांबल्या


No comments:

Post a Comment