Monday, June 6, 2011

(३६) वय निघून गेले.............................कवीची दुरवस्था



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



वय निघून गेले कवीची दुरवस्था



देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघून गेले

एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदरात फिरण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
का हा आला वसंत
हाय्‌, फुले टिपण्याचे वय निघून गेले

कवी : सुरेश भट



देखावा बघण्याचे माझ्या कपाळी आले -
श्रोते निघून गेले, श्रोते निघून गेले

गेले ते सोडुन सभागृह
होतो वाचत मत्काव्यसंग्रह
पाउल उचलुन शांतपणे श्रोते निघून गेले

कळ आली पाहुन दृश्य
गेलो ठरवला जणु अस्पृश्य
दुर्लक्षुन मज श्रोते निघून गेले

रोज करतसे मी एक काव्य
असणार ते पूर्ण अश्राव्य
काव्य रचत बसण्याचे धार्ष्ट्य निघून गेले

झटापट करतसे रातंदिन
घडण्या दाट काव्यामृतघन
त्या पावसात भिजण्याचे स्वप्न विरून गेले

हृदयाचे तरुणपण
ओसरले नाही, पण
स्वप्नगीते रचण्याचे धार्ष्ट्य निघून गेले

एकटाच मज बघून
गीतांची चळत नजिक
मजसाठी अश्रू ढाळे, तेही विरले

झाला असे अता अंत
मत्काव्यरचनेचा, ही खंत
हाय्‌, “ट”ला “ट” जोडण्याचे दिवस निघून गेले!



No comments:

Post a Comment