Monday, June 6, 2011

(३७) काळ देहासी आला खाऊ.....................खाऊ



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



काळ देहासी आला खाऊ खाऊ


काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ

कोणे वेळे काय गाणे
हे तो भगवंता मी नेणे

टाळ मृदुंग दक्षिणेकडे
माझे गाणे पश्चिमेकडे

नामा म्हणे बा केशवा
जन्मोजन्मी द्यावी सेवा

संत नामदेव

रूप देहासी देई "खाऊ"
आम्ही नाचतो पैसेखाऊ

कोणे वेळे कोण देती
म्या भाग्यवंता “खाऊं”ची पोती

टाळ मृदुंग जिकडेतिकडे
माझे गुणगाणे सगळीकडे

मी मंत्री म्हणे बा केशवा
जन्मोजन्मी द्यावा असाच मेवा


No comments:

Post a Comment