खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
व्यथा | प्रथा |
---|---|
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो आसवांना पावसाचे नाव देतो सागराने ऐनवेळी घात केला वादळाहातीच आता नाव देतो मागतो जो तो फुले ताजीतवानी कोण निर्माल्यास येथे भाव देतो? खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी आज दुःखाला जरासा वाव देतो कवी : प्रसन्न शेंबेकर | मी प्रथांना असतील तशा संभाळतो प्रथांना चिरंतनाचे नाव देतो मांजराने जर ऐनवेळी "घात" केला येऊनी आडवे, तर मी बिचकतो माळतो फुले मी हारीं ताजीतवानी नि निर्माल्यास भाविकतेने भाव देतो ऐसे जातसे सारे आयुष्य माझे ये अरे मृत्यो ! तुझे मी श्राद्ध करतो जगतो जीवन माझे स्थितप्रज्ञतेने आत्मचरित्रा त्रोटक इथे वाव देतो ! |
कवीची परवानगी घेऊनच विडंबन करायला हवे. विडंबन सुद्धा दर्जेदार असायला हवे , जे इथे नाही.
ReplyDelete