Monday, June 6, 2011

(३९) तू वेडा कुंभार..............................राजकीय पक्षनेत्याचे स्तवन



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तू वेडा कुंभार राजकीय पक्षनेत्याचे स्तवन



फिरत्या चाकावरती देसी
मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत ना पार

घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी,
कुणा मुखी अंगार

तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी
तयापुढे अंधार

कवी : ग. दि. माडगूळकर


उंच आसनावरी बसुनी
करसी आदेशांचा पुकार
महाराजा, तुझा बडा अधिकार

माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत ना पार

घडीघडीचे तव रूप आगळे
प्रत्येक कृतीचे परिणाम वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या घालसी लोणी,
कुणा मुखी अंगार

तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
कळे त्यातुन वित्त जोडिसी
बघत राहतो दोन्ही डोळ्यां
सगळा तुझा चमत्कार!


No comments:

Post a Comment