Tuesday, June 7, 2011

(४०) अजुनी रुसून आहे.....................कविराजाची रुष्ट प्रतिभेकडे आळवणी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अजुनी रुसून आहे कविराजाची रुष्ट प्रतिभेकडे आळवणी


अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना

कवी : अनिल

अजुनी मी बसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तुझे तू ओठ, ओळ एकही सुचेना

गप्प मी बसावे म्हणुनी तू का रुसावे?
ऐक गंधर्व सांगतात, न रुसता तू हसावे
आज का नसाविस प्रसन्न तू कळे ना
धरिलास अबोला जेणे लिहू काही ये ना

पाही परिपाक माझ्या अश्रूंत होत आहे
ज्यांची परिणती सागरी, जाणी होणार आहे
चाले अटीतटीने झटपट, माझी परी सुटेना
जुळवू पहाता "ट"ला, "ट" जराही जुळेना

की गूढ काही करु मी, काव्य बांधून चंग
घेतो अता खोल ठाव उपसूनी अंतरंग
रुसवा तुझा कसा हा काही म्या कळेना
जुळवू पहाता "ट"ला, "ट" जराही जुळेना


No comments:

Post a Comment