खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तेच ते | कवीचे रडगाणे |
---|---|
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते खानावळीही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. 'काकू'पासून 'ताजमहाल', सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी तेच ते आंबट सार सुख थोडे दु:ख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे त्या स्वप्नांचे शिल्पकार, कवि थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध नऊ धागे एक रंग, व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच 'मंदिर' तीच 'मूर्ती' तीच 'फुले' तीच 'स्फूर्ती' तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एकतारी करीन म्हटले आत्महत्त्या रोमिओची आत्महत्त्या दधीचिची आत्महत्त्या आत्महत्त्याही तीच ती आत्मा ही तोच तो हत्त्याही तीच ती कारण, जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते कवी : विंदा करंदीकर | सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !! रडगाणे कवीचे एकच - काय तर 'तेच ते'; तेच गाणे तेच तराणे तेच सूर कंटाळवाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते ओळी बदलून पाहिल्या ओळींच्या चोर्या करून पाहिल्या 'काकू'पासून 'ताजमहाल', सगळीकडे सारखेच हाल 'नरम मसाला, गरम मसाला', अनुप्रासांचा पालापाचोळा तीच ती खवट यमके तेच ते आंबट ठेके अर्थाला मात्र कविता मुके वाङ्मयाच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे त्या स्वप्नांचे शिल्पकार, कवि थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध नऊ धागे एक रंग, कवड्यांचा एकच ढंग पुन्हा पुन्हा तोच षोक उरे केवळ मागे शोक तेच 'मंदिर' तीच 'मूर्ती' तीच 'फुले' तीच 'स्फूर्ती' तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी - कविता पैश्याला पासरी "करीन म्हणतो आत्महत्त्या रोमिओची आत्महत्त्या दधीचिची आत्महत्त्या आत्महत्त्याही तीच ती आत्मा ही तोच तो हत्त्याही तीच ती कारण, जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते." - युक्तिवाद असे अनेक करत राही आत्महत्त्या पुढे ढकलत राही! |
No comments:
Post a Comment