खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
आज कुणीतरी यावे | कधी न त्याने यावे |
---|---|
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे जशी अचानक या धरणीवर बरसत आली वळवाची सर, तसे तयाने यावे विचारल्याविण हेतू कळावा त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे सोडोनिया घर नाती गोती निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे कवि: ग.दि. माडगूळकर चित्रपट: मुंबईचा जावई (१९७०) | कधी न त्याने यावे, न आगंतुक व्हावे जशी अचानक या धरणीवर पसरत यावी एक वावटळ, तसे न त्याने यावे अंतर्ज्ञाने बेत कळावा त्याचा, म्हणजे "काय करावे?", हातोहात ठरावे सोडुनिया घर, लावुनि कूलूप पळ काढावा तो येण्याआधी, कुठे जरी न ठावे |
आज कुणीतरी यावे | एक शेखमहंमदी स्वप्न : एखाद्या भोळसट श्रीमंताशी गाठ |
---|---|
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे जशी अचानक या धरणीवर बरसत आली वळवाची सर, तसे तयाने यावे विचारल्याविण हेतू कळावा त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे सोडोनिया घर नाती गोती निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे कवि: ग.दि. माडगूळकर चित्रपट: मुंबईचा जावई (१९७०) | आज कुणीतरी द्यावे पैसे व्याजा-अभावे जशी अचानक या धरणीवर बरसत यावी वळवाची सर, तसे तयाने द्यावे विचारल्याविण हेतू कळावा त्याचा मजवरी लोभ जडावा, हाती रोकड धरावे सोडुनी सारा विचारविवेक पैश्यांची मजकडे करावी फेक, का ते त्याही न ठावे! |
No comments:
Post a Comment