खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
जाईन विचारित रानफुला | एक छोटी पृच्छा आणि प्रदीर्घ उत्तर |
---|---|
जाईन विचारित रानफुला भेटेल तिथें ग, सजण मला भग्न शिवालय परिसर निर्जन पळसतरूंचे दाट पुढें बन तरुवेली करतिल गर्द झुला उंच पुकारिल मोर काननीं निळ्या ढगांतुन भरेल पाणी लहरेल विजेची सोनकळा वाहत येइल पूर अनावर बुडतिल वाटा आणि जुनें घर जाइल बुडुन हा प्राण खुळा कवयित्री : शांता शेळके | जाईन विचारित रानफुला "मिळेल कुठे बा, रसगुल्ला?" "भग्न शिवालय परिसर निर्जन पळसतरूंचे दाट पुढे बन तरुवेली सांगतिल मार्ग तुला "उंच पुकारिल पोर्या दुकानी गिलासी भरता गढूळ पाणी ’एक चाय, दो रसगुल्ला’ "घेउन येइल पोर्या सत्वर ’गुल्ला-वाटी नि चाय कपभर तुष्ट होइल तव जीव भला" |
जाईन विचारित रानफुला | मी जाई विचारित जानपदा |
---|---|
जाईन विचारित रानफुला भेटेल तिथें ग, सजण मला भग्न शिवालय परिसर निर्जन पळसतरूंचे दाट पुढें बन तरुवेली करतिल गर्द झुला उंच पुकारिल मोर काननीं निळ्या ढगांतुन भरेल पाणी लहरेल विजेची सोनकळा वाहत येइल पूर अनावर बुडतिल वाटा आणि जुनें घर जाइल बुडुन हा प्राण खुळा कवयित्री : शांता शेळके | मी जाई विचारित जानपदा दिसला का घरधनी बेपत्ता? भग्न शिवालय परिसर निर्जन मंडई, सर्कस, रेल्वे स्टेशन पाय दुखती वणवण फिरता उंच पुकारिता वेड्यावाणी नेत्री माझ्या भरले पाणी लागे वाटू मज हतबलता वाहत येई पूर अनावर बुडल्या वाटा, भीती मनावर जाइन बुडुन मी दैवहता! |
No comments:
Post a Comment