खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
मी तिला विचारलं | एका मंत्र्याची त्रोटक जीवनकहाणी निवेदक : एक बडा व्यापारी |
---|---|
मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.... तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं? त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं.... तुमचं लग्न ठरवुन झालं? कोवळेपण हरवुन झालं? देणार काय? घेणार काय? हुंडा किती,बिंडा किती? काड्या किती? साड्या किती? याचा मान,त्याचा पान सगळा मामला रोख होता, व्यवहार भलताच चोख होता.... हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं... ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या.... मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.... त्या धुंदीत, त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला, इराण्याच्या हॉटेलात चहासोबत मस्कापाव मागवला तेवढीसुद्धा ऐपत नव्हती, असली चैन झेपत नव्हती देवच तेव्हा असे वाली, खिशातलं पाकीट खाली त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं? मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.... मग एक दिवस, चंद्र, सूर्य, तारे, वारे, सगळं मनात साठवलं, आणि थरथरणाऱ्या हातांनी तिला प्रेमपत्रं पाठवलं आधिच माझं अक्षर कापरं त्या दिवशी अधिकचं कापलं रक्ताचं तर सोडाच राव हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं, पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा तुम्हाला सांगतो, पोस्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे, माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे मनाच्या फांदीवर, गुणी पाखरु येउन बसलं मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.... पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं, मुलं झाली, संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली.... तसा प्रत्येकजण नेक असतो, फरक मात्र एक असतो कोणता फरक? मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.... कवी : मंगेश पाडगांवकर | मी ह्ळुच विचारलं, त्याने हळुच होय म्हटलं, असणारच तोंडाला त्याच्या पाणी लगेच सुटलं.... तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं? म्हणालात अगदी बरोबर, नवीन नाही काही घडलं! आमचं सारं ठरवुन झालं चलाखी राखून झालं “देणार काय?” "मोबदल्यात घेणार काय?” “रोकड किती?” “निकड किती?” “गाड्या किती?” “पोती किती?” मग झालं जेवणखाण; त्यानंतर मद्यपान छान सगळा मामला होता व्यवहार अगदी झकास होता! हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं असलं गाडं तुमच्या वळणी असणार कसं.... ते सगळं जाऊ द्या, निवेदन माझं मला करू द्या.... मी ह्ळुच विचारलं, त्याने हळुच होय म्हटलं, असणारच तोंडाला त्याच्या पाणी लगेच सुटलं.... त्या धुंदीत, त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला; "ताजमहाल" हॉटेलात व्हिस्कीसोबत शीशकबाब मागवला पैश्याची फिकीर नव्हती ही नकली चैन नव्हती. सिगरेट त्याने शिलगावली, खिशातलं पाकीट पडलं खाली. रोजच्यासारखा रुबाबात सिंहागत होता वागत पोलिस नित्याच्या अदबीने होते सलाम ठोकत माणूस असा तरंगतो त्याला भय असणार कसलं? मी ह्ळुच विचारलं, त्याने हळुच होय म्हटलं, असणारच तोंडाला त्याच्या पाणी लगेच सुटलं.... मग एक दिवस, चंद्र, सूर्य, तारे, वारे - आम जनता नि दिवस फिरले आणि कुणाच्या चलाख हातांनी त्याला एक ब्लॅकमेल पाठवलं अक्षर होतं किरटं पण मजकुराने त्त्याचं काळीज कापलं रक्ताच्या जणु चिळकांड्या उडाल्या थरथरत्या हातांनी त्याने पत्र फाडून टाकलं, आणि आठवलं पाकिटावर तिकिट नव्हतं लावलेलं पण तरी पत्र होतं पोचलं; "त्याचा अर्थ आहे असा - पोस्टमन सामील असला पाहिजे, कृष्णकारस्थानात त्याचासुद्धा हात नक्की असलाच पाहिजे "माझ्या मानगुटीवर कोणी समंध येऊन बसला आहे." मी ह्ळुच विचारलं, त्याने हळुच होय म्हटलं, असणारच तोंडाला त्याच्या पाणी लगेच सुटलं.... पुढे मग एका कारागृहात त्याची रवानगी झाली होती - लाचलुचपत निष्फळ ठरून; आणि त्याला शिक्षेखातर घासावी लागली होती भांडीसुद्धा तसा प्रत्येकजण नेक असतो, फरक मात्र एक असतो - मंत्र्यांची नेकी अलौकिक असते मी ह्ळुच विचारलं, त्याने हळुच होय म्हटलं, असणारच तोंडाला त्याच्या पाणी लगेच सुटलं.... |
No comments:
Post a Comment