खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
शब्दांवाचुन कळले सारे | लाच |
---|---|
शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ? घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले होय म्हणालिस नकोनकोतुन तूच व्यक्त झालीस स्वरातुन नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले कवी : मंगेश पाडगांवकर | शब्दांवाचुन जुळले सारे शब्दांच्या पलिकडले एकमेकां दिशीं त्या पाहिले आणि अपुले गुपित जन्मले अर्थ नवा शब्दांस मिळाला अर्थ “एक लाख" “एका"ला त्या दिवशी का न कळे अपुले एक मिनिट घोडे अडले पण अपुले गुपित जन्मले शब्दांच्या पलिकडले होय म्हणालो नकोनकोतुन शब्द "अपुल्या” शब्दकोशातुन नसता कारण शिंक येऊन उगिच हृदय धडधडले पण अपुले गुपित जन्मले शब्दांच्या पलिकडले आठवते अमुशेच्या रात्री लक्ष दीप उजळले मम गात्री तव बंद मुठीने रहस्य अपुले छानपणे झाकले असे अपुले गुपित जन्मले शब्दांच्या पलिकडले |
शब्दांवाचुन कळले सारे | अर्थावाचुन रचले सारे |
---|---|
शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ? घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले होय म्हणालिस नकोनकोतुन तूच व्यक्त झालीस स्वरातुन नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले कवी : मंगेश पाडगांवकर | अर्थावाचुन रचले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम मनी साहस आले आणिक घडू नये ते घडले अर्थ न त्या गीतास मिळाला छंद नसे वा ताल तयाला त्या दिवशी का प्रथमच माझे मन ऐसे तडमडले? घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले धुंडुनि शब्द कोनकोन्यातुन गीत गाइलो मम आर्त स्वरातुन नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले आठवते अमुशेच्या रात्री दिवा जाळला होता अपरात्री "प्याल्या"त गमले होते विश्वाचे रहस्य मज उलगडले घडू नये ते घडले शब्दांच्या पलिकडले |
No comments:
Post a Comment