खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
सांग कधी कळणार तुला | हट्टी सुपुत्रास - |
---|---|
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला? गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कुणी अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला? निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला? जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला? कवी : मधुसूदन कालेलकर चित्रपट : अपराध |
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? रंग कधी दिसणार तुला माझ्या ह्या डोळ्यांतला? निःसंदिग्ध शब्दांमधुनी सांगितले तुज हजारदा मी अर्थ कधी कळणार तुला उंच माझ्या सुरातला? भुवया माझ्या आकुंचित होती कपाळी रेखा माझ्या उठती राग कधी कळणार तुला माझ्या तप्त रक्तातला? सांगते तुज शेवटच्या वेळी लाटणे आहे कोणत्या स्थळी खेळ कधी संपणार तुझा? न करू इच्छिते तुला इजा! |
No comments:
Post a Comment