Wednesday, June 8, 2011

(४७) नाते (१).................................घरोघर मातीच्या चुली
*****नाते (२).................................घोळ



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



नाते घरोघर मातीच्या चुली



नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सगळ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई
ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजुळांचा बरसे दिशात दाही
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
मंझिलकी जयांचि तारांगणात राही

कवी : कुसुमाग्रज


नात्यास नाव अपुल्या "राजा ’णि त्याची राणी"
भांडणांची अपुल्या पण चालू सदैव गाणी
शेजार्‍यापाजार्‍यांची होते ती मौज होवो
कुजबुजींमधूनी त्यांची प्रज्ञा वहात जाई
ना ताळतंत्र यांच्या बंधात बांधलेला -
रव भांडणांचा अपुल्या पसरे दिशात दाही
गावातल्या "शहाण्यां" पथ काय तो पुसावा?
घरोघर बर्शेनच्या चुली ही बात आहे सही




नाते घोळ


नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सगळ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई
ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजुळांचा बरसे दिशात दाही
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
मंझिलकी जयांचि तारांगणात राही

कवी : कुसुमाग्रज


घोळास नाव त्यांच्या द्यावे कसे हो काही?
सगळ्याच गोंधळाची जगतास जाण नाही
सूज्ञ मंडळींचा उपदेश काही होवो
नाल्यातुनीच त्यांची बुद्धी वहात जाई
ना ताळतंत्र यांच्या बंधात बांधलेला -
कल्लोळ गोंधळाचा पसरे दिशात दाही
गावातल्या जनांना तमाशा कसा दिसावा?
नजर, हो, जयांचि नाकासमोर राही



No comments:

Post a Comment