खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
सांज ये गोकुळी | मंत्री ये गोकुळी |
---|---|
सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणु सावली धूळ ऊडवीत गाई निघाल्या शाम रंगात वाटा बुडाल्या परतती त्या सवे पाखरांचे थवे पैलघंटा घुमे राउळी सांज ये गोकुळी पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणु दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळ्या चाहुली सांज ये गोकुळी माउली सांज अंधार पान्हा विश्व सारे जणु होई कान्हा मंद वार्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणु ओंजळी. सांज ये गोकुळी कवी : सुधीर मोघे |
मंत्री ये गोकुळी, सकाळी सकाळी ईश्वराचीच सावली धूळ ऊडवीत गाड्या आल्या शाम रंगात वाटा बुडाल्या असती त्याच्या सवे पित्त्यांचे त्याच्या थवे उदो उदो घुमे गोकुळी मंत्री ये गोकुळी जनतेची जमे गर्दी खूप मंत्र्याची अपुल्या गावा भेट, अप्रूप होई डोहातले चांदणेही स्तब्ध देणगी ईश्वरी भावली मंत्री ये गोकुळी ईश्वरावतार पाताळयंत्री विश्व सारे जणु होई मंत्री धुंद वार्यावरी वाही त्याची कीर्ती उदो उदोंची प्रदीर्घ साखळी मंत्री ये गोकुळी |
No comments:
Post a Comment