Saturday, June 11, 2011

(४९) सांग सांग, भोलानाथ.............आळवणीची वीस वर्षांनंतरची नवी आवृत्ती



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



सांग सांग, भोलानाथ
आळवणीची वीस वर्षांनंतरची
नवी आवृत्ती

सांग सांग, भोलानाथ, पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?

भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार येतील का रे तीनदा?

भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?

कवी : मंगेश पाडगांवकर


सांग सांग, भोलानाथ, पाऊस पडेल काय?
हपिसाभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?

भोलानाथ, दुपारी बॉस झोपेल काय?
डुलक्या तो घेताना आवाज कुणी करेल काय?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार येतील का रे तीनदा?

भोलानाथ, उद्या आहे हिशेबांचा ऑडिट
मारता येईल का रे दांडी हपिसा दुखूनिया पोट?




No comments:

Post a Comment