खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
घन रानी, साजणा! | हायकिंग् |
---|---|
घन रानी, साजणा! मी कशी तुझ्यासवे चुकले वाट रे, सांग ना घन रानी साजणा! भिरभिर वाऱ्याची थरथर पाण्याची अवखळ सजणी मी मनभर गाण्याची तरी बाई सूर नवे नवे सुखद मधुर वाटतात हवे या मना घन रानी, साजणा! मधुमय समय असा बहरुन कुंज हसे तरळत गंध नवा वय ते लावी पिसे इथे तिथे गोड निळेपण बावरते मन साद घालि कोण यौवना ? घन रानी, साजणा! किती अधीर अधीर भाषा प्रीतीची मन माझे, मन माझे, मन बोलत नाही ग माझे किती लाजे, किती लाजे, वेडे लाजरे मन ग माझे एक शपथ शपथ त्याला प्रीतीची हृदया रे अदया रे बोल ना घन रानी, साजणा! कवयित्री : शांता शेळके | घन रानी, सुहृदा! अपुल्या डोळ्यांत आसवे चुकलो वाट अपुली खचित घन रानी, सुहृदा! पिरपिर वाऱ्याची कमतरता पाण्याची झुंबड अवखळ डासांची अविरत गुणगुणणारी सूर त्यांचे नवे नवे अतिबेसूर भासतात त्रस्त मना घन रानी, सुहृदा! संध्यासमय असा तिमिरी जो ढळतसे तरळती रातकिड्यांची किर्र किर्र लावी पिसे इथे तिथे भयाणपण घाबरले मन, धीर देई कोण आपणा? घन रानी, सुहृदा! किती अधीर अधीर भाषा भीतीची शुष्क शुष्क ओठ बोलत नाही अपुले किती बसे, किती बसे दातखीळ न कळे एक शपथ शपथ घ्यावयाची तयारीविण हायकिंग् न यापुढे कदा घन रानी, सुहृदा! |
No comments:
Post a Comment