Sunday, June 12, 2011

(५१) यार हो............................................कवी होशियार



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



यार हो कवी होशियार


सूर्य केव्हाच अंधारला, यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला, यार हो

ते सुखासीन संताप गेले कुठे
हाय, जो तो मुका बैसला, यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला, यार हो

जे न बोलायचे तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला, यार हो

सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला, यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हुंदकाही नसे आपला, यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला, यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला, यार हो

आज घालू नका हार माझ्या गळा
मी कुणाचा गळा कापला, यार हो

कवी : सुरेश भट


सूर्य केव्हाच अंधारला, यार हो
नव्या कविता रचतो मी अता चार हो

काही गिरफ्त शब्द आणले कैदी म्हणूनी
कैदखाना नवा नसे पण, यार हो

ते सरळ-सुलभ अर्थ गेले पळूनी
अन क्लिष्टार्थ ठाण मांडून बैसले, यार हो

कवनांची माझ्या करा विपुल कौतुके
जाणूनी अगम्य कला माझी, यार हो

जे न लिहिण्याजोगे तेच मी लिहितो
मीच कविश्रेष्ठ आहे भला, यार हो

सोडीन मी कधी न माझी स्वप्नभूमी
जीवनाची कर्मभूमी जाणा, यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हसुनी अवज्ञा करण्या धजा न, यार हो

ओळखीचा निघे दुसरा कवी एक
कवनचोरीचा धोका मला, यार हो

रसिक घरापुढे यावया लागले
दूर नाही अता सत्कार, यार हो

आज घाला हार मोठ्ठा माझ्या गळा
न कापता परी गळा त्याचवेळी, यार हो



No comments:

Post a Comment