Sunday, June 12, 2011

(५२) समईच्या शुभ्र कळ्या......................समयाच्या शुभ्र कळ्या



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



समईच्या शुभ्र कळ्या समयाच्या शुभ्र कळ्या




समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;
केसातच फुललेली जाई पायांशी पडते!

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे;
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे!

साचणा-या आसवांना पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची!

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ग ये!

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा!

कवी : आरती प्रभू



समयाच्या शुभ्र कळ्या उमलती, त्यांचे निर्माल्य होते
फुललेल्या जाईंचे वेलीच्या पायांशी पडते

फुलपाखरे फडफडती फुलांच्या मागे-पुढे
कणभर मकरंद तयांना त्यांमधे सापडे

साचल्या निर्माल्यास पेंग येते चांदण्यांची
समयदेवी असे विसराळू मुलखाची!

काही फुले कुणी माळे देवाच्या प्रतिमेला
काही फुले शोभविती कुणा स्त्रीकेशसंभाराला

समयाच्या नविन कळ्या उमलती, त्यांचे निर्माल्य होते
फुललेल्या जाईंचे वेलीच्या पायांशी पडते


No comments:

Post a Comment