खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
रंध्रात पेरिली मी | श्रोत्यात पेरिली मी |
---|---|
रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे धारांत नाहणारी धरतीच गे इमानी पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे मातीत मातलेला आवेगही तुफानी सोसून सोसवेना गात्री अलक्ष धारा प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी प्राणात हूड वारे हलतेच झाड आहे त्यानीच ढाळलेली तू माळिली विराणी कवी : शंकर रामाणी |
श्रोत्यात पेरिली मी माझी दर्दी गाणी ज्यांमधे गुंफिली मी आर्त माझी कहाणी पुसणार का आस्थेने माझी सर्दी कोणी असेल श्रोत्यांमधे का कोणी प्राणी इमानी पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे मातीत मातलेला आवेगही तुफानी सोसून सोसवेना नाकी लक्ष धारा प्राशूनही अगद येते डोळ्यांत मूढ पाणी प्राणात हूड वारे हलतेच झाड आहे त्यानीच ढाळलेली मी माळतो विराणी |
No comments:
Post a Comment