खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अखेर कमाई | फलाण्या मंत्र्याचे स्वगत |
---|---|
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फ़क्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती! कवी : कुसुमाग्रज |
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फ़क्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती! * * * * * * * * * * * * * * * * * * * फलाणे मंत्री आपल्याशी म्हणाले, माझ्या जिल्ह्याच्या मुख्य शहरात माझा मोठ्ठा पुतळा दोन वर्षात उभा करण्याची तजवीज मी केलीच पाहिजे. |
No comments:
Post a Comment